NEWS VELOCITY.IN

Latest News Of Political, Sports, Share Market And Entertainment Industry From India

शेमारू भक्तीची ताजी पेशकश गीत रामायण, सुरेश वाडकर यांच्या सुरेल आवाजात ९० मिनिटांत ऐका रामायणाच्या अद्भुत कथा

भगवान राम आणि रामायणामध्ये गहन आस्था असलेल्या भक्तांसाठी शेमारू भक्तीची अनोखी प्रस्तुति गीत रामायण आहे. भक्तगण शेमारू भक्ती यूट्यूब चॅनलवर गायक सुरेश वाडकर यांच्या आवाजात गीत रामायणच्या माध्यमातून केवळ ९० मिनिटांत संपूर्ण रामायण ऐकण्याचा आनंद घेऊ शकतात. यात कोणतीही शंका नाही की या संगीतमय प्रस्तुतीमुळे श्रोत्यांना भारताच्या प्राचीन सभ्यता आणि संस्कृतीचा परिचय होईल.

गीत रामायणामध्ये रामायणातील कालजयी श्लोकांना सुरेश वाडकर यांनी अतिशय आत्मीयतेने त्यांच्या मधुर आवाजात सजवले आहे. उल्लेखनीय म्हणजे, गीत रामायणात बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, लंकाकांड, सुंदरकांड, उत्तरकांड यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे, जे श्रोत्यांना रामायण कालाच्या सफरीसाठी सक्षम आहे.

गीत रामायण समस्त भक्तांना समर्पित करताना सुरेश वाडकर म्हणाले, “गीत रामायण हे केवळ एक संगीतमय प्रस्तुति नाही. हे एक अलौकिक प्रवासाची अनुभूति प्रदान करते, जे आपल्याला दिव्य शक्तीशी जोडण्याचा अनुभव देते. मला अत्यंत सौभाग्यवान वाटते की मला गीत रामायणाशी जोडण्याची संधी मिळाली. रामायणाच्या कालजयी संदेश नेहमीच लोकांसाठी प्रासंगिक राहिले आहेत. गीत रामायण ऐकून लोकांना शांती, प्रेरणा आणि दिव्य मार्गदर्शनाचा अनुभव होईल आणि त्यांना रामायणाच्या अमर कथांना जाणण्याची सुवर्णसंधी मिळेल.”

त्यांच्या सर्व गीतांच्या गहनते आणि उत्कृष्ट संगीताद्वारे गीत रामायण तुम्हाला रामायणासारख्या कालजयी रचनेच्या वास्तविक अर्थाचे दिव्य अंदाजात समजून घेण्याचा अद्भुत प्रयत्न आहे. गीत रामायणाला संगीतबद्ध करण्याचे श्रेय गोविंद प्रसन्न सरस्वती यांना जाते तर हे गीत रमन द्विवेदी यांनी लिहिले आहे. सुरेश वाडकर यांच्या मधुर आवाजात गायलेली गीत रामायणाची सर्व भक्तिगीतं थेट लोकांच्या हृदयात आपले स्थान मिळवतील.

गीत रामायणाच्या रूपात शेमारू भक्ती आणि सुरेश वाडकर यांची ही जुगलबंदी परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा संगम आहे, ज्याला अत्यंत सुंदरतेने आणि सुरेल अंदाजात प्रस्तुत करण्यात आले आहे. आजच्या काळात, जिथे सर्वत्र डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा बोलबाला आहे, शेमारू भक्ती समय-समयावर आस्थेने भरलेले कंटेंटच्या माध्यमातून भक्ती, अध्यात्म आणि ज्ञानाचा असा सागर आपल्यासमोर सादर करते की, ज्यात नियत रूपाने डुबकी मारल्याने आपले जीवन सफल होईल.

आजच्या विचित्र काळात गीत रामायण लोकांना आत्ममंथन आणि स्वतःला शोधण्याची अशी संधी प्रदान करते की, जी आपल्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन आणण्याची क्षमता ठेवते. हीच कारणे आहेत की गीत रामायण नक्की ऐकावे आणि आत्मसात करावे. गीत रामायण भक्ती सोबत प्रेम, आराधना आणि शांतीचाही संदेश वाहक आहे.

शेमारू भक्ती यूट्यूब चॅनल आणि सुरेश वाडकर यांची प्रस्तुति गीत रामायण केवळ एक उत्कृष्ट संगीतमय प्रस्तुति नाही, तर हे भक्तांच्या भावना आणि त्यांची आस्था देखील दर्शवते. सुरेश वाडकर यांच्या मधुर आवाजात सजलेले गीत रामायणाचे आध्यात्मिक श्लोक अशी अनुभूति देतात की, जी थेट भक्तांच्या हृदयाला स्पर्श करते.

शेमारू भक्ती यूट्यूब चॅनल आणि ShemarooMe ओटीटी व्यतिरिक्त श्रोते गीत रामायणाला JioSaavn, Gaana, Hungama Music, Wynk Music, Spotify India, Apple Music, आणि YouTube Music वर देखील ऐकू शकतात.

शेमारू भक्तीची ताजी पेशकश गीत रामायण, सुरेश वाडकर यांच्या सुरेल आवाजात ९० मिनिटांत ऐका रामायणाच्या अद्भुत कथा