मागील वर्षी प्रदर्शित झालेला ‘मीडियम स्पाइसी’ हा चित्रपट आता ओटीटीवर आला आहे. सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट नात्यांची गुंतागुंत आणि त्यांचं तरल चित्रण दाखवणारा होता. चित्रपटाचे चाहते अनेक दिवस हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार या प्रतिक्षेत होते, मात्र आता ही प्रतिक्षा संपली आहे.
‘मीडियम स्पाइसी’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफोर्मवर बघायला मिळेल. त्यामुळे ज्या प्रेक्षकांचा हा चित्रपट थिएटरमध्ये बघायचा राहिला असेल, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच आहे. दिग्दर्शक मोहित टाकळकर यांनी एका वेगळ्या आणि अनोख्या विषयावरील चित्रपट आपल्यासमोर सादर केला आहे, याला प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कार सोहळ्यात नामांकनेही मिळाली. मटा सन्मान, प्रवाह पिक्चर पुरस्कार, फिल्मफेअर अॅवॉर्ड, सकाळ प्रीमियर अॅवॉर्ड, बॉलीवूड फेस्टिवल नॉर्वे, रिव्हर टू रिव्हर फिल्म फेस्टिव्हलमध्ये क्लोजिंग फिल्म, स्टुटगार्ट फिल्म फेस्टिव्हल, साऊथ एशियन फिल्म फेस्टिवल, ढाका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अशा अनेक नामांकित पुरस्कार सोहळ्यात व फिल्म फेस्टिवल्समध्ये ‘मीडियम स्पाइसी’ला मानाचं स्थान मिळाले. आता हा चित्रपट ओटीटीवर येत असल्याने तो केव्हाही, कधीही, कुठेही बघायची मुभा प्रेक्षकांना मिळेल.
विधि कासलीवाल निर्मित, लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, इरावती कर्णिक लिखित आयुष्यात हव्या असलेल्या गोष्टींचा समतोल साधत मध्यममार्गाचा मागोवा घेणारा ‘मीडियम स्पाइसी’ आता तुम्हाला अॅमेझॉन प्राइमवर बघायला मिळेल.
विधि कासलीवाल निर्मित, लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत मीडियम स्पाइसी आता बघा ॲमेझॉन प्राइमवर!
More Stories
DPIAF -Minister MP & MLA Gold Award 2025, New Delhi Organiser By Kalyanji Jana
Ajat Talwar Fitness Model & Business Entrepreneur
DPIAF – Bharat Gaurav Iconic Award 2025 Organiser By Kalyanji Jana