मुंबई दि.३: महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वित्तीय सल्लागार वमुख्यलेखावित्तधिकारी पदी चित्रलेखा खातू-रावराणे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. सोमवारी त्यांनी पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी त्या उप अधिदान व लेखा अधिकारी म्हणून अधिदान व लेखा कार्यालय मुंबई येथे कार्यरत होत्या.
श्रीमती चित्रलेखा यांची २०११ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा या संवर्गात सहायक संचालक म्हणून निवड झाली. या काळात देयके, निधी, व्यवस्थापन, लेखा इ. विषयामध्ये त्यांनी काम केले. त्यानंतर २०१६ ते २०१९ या कालावधीत वित्तीय सल्लागार व उप सचिव,अन्न नागरी पुरवठा येथे सहायक संचालक अर्थसंकल्प म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. तसेच २०१९ ते २०२३ या कालावधीत कोषागार अधिकारी ( राज्यस्तरीय ) शासकीय जमा लेखांकन प्रणाली येथे उत्तम सेवा बजावली आहे. दरम्यान त्यांनी सार्वत्रिक निवडणूकामध्ये मुंबई शहर विभागात निवडणूक खर्च समन्वयक अधिकारी/ उप अधिकारी म्हणूनही कामकाज केले आहे.
श्रीमती चित्रलेखा यांची वित्तीय कामावर उत्तम पकड असून प्रशासकीय कामाचीही त्यांना जाण आहे. विशेष म्हणजे त्या उत्तम लेखिका,निवेदिका आणि गायिका असून शासनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. महामंडळात वित्तीय शिस्त आणण्याबरोबर लेखा विषयक कामकाजाला गतिमानता आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे श्रीमती चित्रलेखा यांनी सांगितले आहे.
जनसंपर्क विभाग
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्यलेखावित्तधिकारी पदी चित्रलेखा खातू-रावराणे यांची नियुक्ती
More Stories
DPIAF -Minister MP & MLA Gold Award 2025, New Delhi Organiser By Kalyanji Jana
Ajat Talwar Fitness Model & Business Entrepreneur
DPIAF – Bharat Gaurav Iconic Award 2025 Organiser By Kalyanji Jana